September 12, 2026
चंद्रमुनी बन्सोड
editor
सडक अर्जुनी – रेंगेपार येथील श्री. मनोहर गोविंदजी डोंगरवार यांचे शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.४५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांचा अंत्यविधी आज शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक स्मशानभूमी, रेंगेपार दल्ली येथे करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी चंद्रकला मनोहर डोंगरवार (जी. प. सदस्य गोंदिया), ललित मनोहर डोंगरवार तसेच परिवार असा आप्तपरिवार आहे.
या दुःखद प्रसंगी डोंगरवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी असून, दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो व शोकाकुल परिवाराला हे अपार दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
श्री. मनोहर गोविंदजी डोंगरवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !





