चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
सडक अर्जुनी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयलारी येथे इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांसाठी दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत भाजीपाला विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनातील व्यवहार, खरेदी-विक्री, दर ठरवणे, ग्राहकाशी संवाद साधने, वजन करणे तसेच पैशाची देवाण-घेवाण यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व्यवहार ज्ञान संवाद कौशल्य आणि स्वावलंबाची भावना विकसित होण्यास मदत झाली. आर्थिक नियोजन आणि स्वावलंबनाचे धडे देण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी स्टॉल लावले. विद्यार्थ्यांनी भाजीपाल्याची मांडणी, दर ठरविणे, ग्राहकांशी संवाद साधणे, वजन करणे तसेच पैशांची देवाणघेवाण यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण व संघभावना विकसित होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयलरचे मुख्याध्यापक सोमेश्वर मेश्राम, सहाय्यक शिक्षक डी. एच. राऊत, मुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच यावेळी भारतीय सैनिक खेमराज पर्वते, हेमू वालदे, विश्वजीत बडोले, सुनिता कोवाचे, यादवराव ब्राह्मणकर, संजय वालदे, तुळसी पर्वते, नरेंद्र वालदे, रमा जनबंधू, शितल पर्वते, प्रणाली मौतेकर, सुप्रिया वालदे, सखाराम डोंगरवार, विजय कोहळे, शंकर ठाकरे तेच गावातील पुरुष महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. दप्तरमुक्त शनिवारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी व कृतीशील शिक्षण मिळत असून, अशा उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.






