
चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
शेतकऱ्यांचे आ. बडोले यांना निवेदन
सडक अर्जुनी: केंद्र शासनाने शेतीतील धान्य
केंद्रावर विकण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी डीसीएस प्रणाली लागू केली आहे. परंतु चिरचाळी / आदर्श येथील पिक पाहणी करतेवेळी असे लक्षात आले की गावातील ५५० च्या जवळपास गटापैकी २०८ गट पीक पाहणी करता उपलब्ध झाले. मात्र १५० च्या जवळपास गट हे जंगलात किंवा गावात दर्शवीत आहेत. या विषयाला घेवून शेतकऱ्यांना आमदार राजकुमार बडोले यांना निवेदन दिले असून जे शेतकरी ई-पीक प्रणालीपासून वंचित आहेत, त्यांना लाभ देण्याची मागणी केली आहे.
शेतकरी बीपी प्रणाली पासून प्रणाली पासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर 1. डीसीएस प्रणालीमध्ये किंवा नकाशामध्ये दुरुस्ती करून देण्यात यावी. या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता चिरचाळी येथील शेतकऱ्यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांना निवेदन सादर केले आहे. ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजली जाते त्यामुळे शेतकऱ्यांची संबंधित शेती गटाची पाहणी ही बंधनकारक असल्याने धनाचे उत्पादन आल्यानंतर केंद्रावर ईपिक प्रणाली पूर्ण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी केली जाते. त्यामुळे चिरचाळी येथील शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये. यामुळे गाव नकाशा दुरुस्ती करून शेतकऱ्यांची ईपिक नोंदणी कशाप्रकारे पूर्ण करून घेता येईल याकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदन देताना सरपंच नीताराम कोडापे चिरचाळी, रमेश मेंढे, धनराज कुंभरे, ताराचंद गायधने, भेंडारकर, लाकेश्वर गायधने, भोजराज सलामे, रतिराम बनसोड, दुर्वास सलामे तसेच शेकडोच्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.





