पशुवैद्यकीय विभागाच्या पशुधन चिकित्सा कार्यक्रमाला पशुपालकांचा प्रतिसाद
चंद्रमुनी बन्सोड गोंदिया

सडक अर्जुनी, दि. २२ सप्टेंबर २०२६ :
सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथे पशुवैद्यकीय विभागाच्या वितीने नियोजित कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत पशुधन चिकित्सा कार्यक्रमांचे आयोजन कस्ण्यात आले. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग, सडक अर्जुनी डॉ. गुणवंत भडके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात गावातील एकूण ४५ गायी व म्हशींवर कृत्रिम रेतन कस्ण्यात आले.
ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी पशुधन हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. पशुधनाची योग्य निगा, वेळेवर उपचार आलि शास्त्रोक्त पद्धतीने प्रजनन व्यवस्थापन केल्यास पशुपालकांना अधिक चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते. याच देशाने पशुवैद्यकीय विभागामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात कृत्रिम रेतन सेवादाता सुधाकर राऊत व सुरेंद्र कोकोडे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. पशुपालकांच्या जनावरांची तपासणी करून आवश्यकतेनुसार कृत्रिम रेतनाची प्रक्रिया कस्ण्यात आली. त्यामुळे पशुपालकांना गावातच पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाली.
पशुधनाचे आरोग्य चांगले राहिल्यास दूध उत्पादनासह पशुपालकांच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांच्या सोयीसाठी अशा प्रकारचे पशुधन् चिकित्सा व प्रजननविषयक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा पशुपालकांनी व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी कस्ण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक कय्युम शेख, माधुरीताई गोफ्ासे, हिमांशू झींगरे, आकाश मौजे, महेश भोगारे, रोहित नेवारे व जागेवर पातोडे यांनी सहकार्य केले. पशुपालकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
पशुधनाची योग्य निगा, शास्त्रोत्तक्त प्रजनन व वेळेवर उपचार यातूनच शेतकन्यांचे आर्थिक बळ वाढते.
डॉ. गुणवंत भडके सहात्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग, सडक अर्जुनी.







